नाती दोन घरे मागे सरकलीयेत,
गल्लीतल्या भिंतींवरून आठवणी ओघळू पाहतायेत....
गाव बदललंय !
थोडे पिकलय .......सालाबादप्रमाणे तरी उत्सवात हरवतंय !
कावळ्यांचा धाक वाढलाय इथे ....
.....राजकारण पण बदललंय !!
पाउस मुजोर झालाय ....
ऐतिहासिक भांडणे दारा-दारातून डोकावतायेत....
गावकी -भावकीची वादळे गटा-तटात सरकतायेत....
वावरा-वाड्यान मध्ये उन्हाळे भर-भरून वाह्तायेत.
रोजच्याच आळशी शांततेत ....
किणकिणत असते घंटा वेशीवरल्या देवळाची
.... घरामागच्या म्हसोबाला आस लागतीय -
कोंबडीच्या मुन्ड्क्याची!!
खेड्यात मी नवीनच आहे...
ReplyDeleteकोसभर दूर तिन्ही गावांच्या वेशीवर माझी वस्ती आहे
घरासमोरच म्हसोबाचे कौल आहे
वस्तीवरही तंटे आणि भानगडी पुष्कळ आहेत
पण ओसरीवरच्या मैफिलीत एकाचे दोन आणि दोनाचे दहा आहेत,
हो ला हो आणि मग ला तग आहे, प्रत्येक शब्दाला वेगळाच रंग आहे
तसा मी खेड्यात नवीन आहे...
तरीही बराचसा रुजलेला आहेस !!
ReplyDeletecoming back to life!! han!!