Thursday, June 9, 2011

संध्याकाळी.....


रोज संध्याकाळी तिच्या बरोबर दिवा-वात लावण्यासाठी देवळात जायचो. सकाळी जायला मला नाही आवडायचे कारण एकतर भरपूर भक्तमंडळी असायची, त्यामुळे ती देव्हाऱ्यात बिझी असायची. दुसरे म्हणजे शाळा भरायची वेळ असायची.

पण संध्याकाळी मंदिरात कुणीच नसायचे. मंदिर कातर शांततेने भारलेले असायचे. घंटा वाजली तर शिरशिरी यावी....
त्याचवेळी बांग व्ह्यायची, बांगेला प्रतिसाद (कि प्रत्युत्तर) म्हणून मी शंख वाजवायचो.

अन ह्या सगळ्या सायं-सोहळ्यात ती मात्र निरांजनाच्या मंद प्रकाशात बुडालेली असायची. तिच्यात देवभक्तीने एक वेगळीच ऊब आली होती. त्या घरात ती उब भिनलीय...तीच ऊब तिच्या घराला आधार झाली असावी.

त्या मंदिरात तिच्या सोबत संध्याकाळ एका संमोहित अवस्थेत संपायची.


अन अशीच एकमेव पर्वाची संध्यकाळ.....
पाली हिल च्या रस्त्यांवरची....

भटकत होतो उगा.....सहज वर पाहिले....चंद्राची कोर चमकत होती. अचानक आठवले अरे इथेच तर राहतात ते....
संमोहन!! थकवा पळाला....घर पाहण्याची उत्सुकता होतीच...पत्त्याची खात्री केली अन चालू लागलो....

बाष्कळ गप्पान मधे भयाण उत्सुकता होती...म्हटले भेट नाय झाली तरी चालेल...पण बोस्कीयाना चे दर्शन तरी घेऊयात.....
नर्गिस दत्त रोड वर आलो...दुरून एका घराच्या बाल्कनीत एक आराम खुर्ची लटकताना दिसली....

....हेच ते....पोटात भोवरे घुमायला लागले....

घरापासून जरा दुरूनच न्याहाळत होतो तेव्हा नेमकी एक चार चाकी समोर येऊन उभी राहिली....द्दान ट डान...

क्षणभरच....संध्याकन मागे सरकले....सफेद कपड्यांत चांदणे जणू बाहेर पडल...

प्रत्यक्ष तेच समोर उभे...रोड च्या पलीकडे ...

नकळत मी हात उंचावला...अन त्यांनी लगेच प्रतिसाद दिला!!

धावतच सुटलो....पायांत....शरीर भर थरथर....य उत्सुकता...


बालिशपणे विचारले...

बस यह देखने आये थे की यहाँ से चाँद कैसा दिखता हैं!

ते जरा हसून...वैसाही जैसे आपके घर से...

मी : लेकिन यह कुछ और हैं.......

पुन्हा एक स्मित....

अजून थोडावेळ असेच काही बोलणे....

पुन्हा लोटांगण....विठ्ठला...

....चंद्राला यमक आहे जणू त्यांचे नाव....



दोन व्यक्ती....
अगणित उबदार सायंकाळी....
शब्द....वात्सल्य.... काव्य ..... आठवणी.... आणि नर्म चाँद ....

आजी आणि गुलज़ार....






5 comments:

  1. संध्याकाळ क्वचितच उबदार वाटते, बोचरा थंड वारा वर्षभरातल्या कुठल्याही ऋतूत अस्वस्थ करतोच......

    प्रकाश आणि अंधाराच्या मध्ये तुम्ही जर एकटे असाल तर तुम्हाला अधिकच एकटे असल्याची जाणीव होते........

    पण कधी कधी .......
    श्याम का जादू भी नाही राज आया, हमराझ तेरी मेहफिल ने हमे मेह्फुज रखा.......

    ReplyDelete
  2. yogyaaaa.. mala he itka avdlay ki busss

    ReplyDelete
  3. सुरेख अनुभव. छान लिहीलाय.

    ReplyDelete