ऑक्टोबर पेडल १
मंदी आलीय.....मंदी आलीय ....
कसले कसले घोटाळे होतायेत ...लोक डूब(वी)ले जातायेत .....
बँका बुडीत होतायेत ...सब प्राईम क्रायसिस वगैरे होतायेत ....काय कि बुवा...
कसले कसले आळशी लोक मात्र खुशीत आहेत.....
एप्रिल मध्ये ऑफिस थंडावल्याचा भास होतोय....
फारसे काम नाहीय....मे महिन्यातले १५ दिन भिंतींना तुंबड्या लावण्यात गेले....
एंड ऑफ द मे .....ऑफिस बंद !! जॉब गेला!!(हुर्रे....हुश्श !!)
एकीचे लग्न झालय नुक्तेच.....
एकीला पुण्यात येउन , ऑफिस जॉईन करून ८-९ महिनेच झालेत...
सर-म्याडम काय करणार आहेत कुणास ठाउक!!
कुनी कुणाचे सांत्वन - निरोप देण्याच्या भानगडीत पडत नाही ...
सगळेच आजूबाजूला असणारेत...आम्हाला ऑफिस चे दरवाजे कायमच उघडे असणारेत....
...माहित्ये.... सूर जुळलेत आमचे बऱ्यापैकी !!
हुं.....
एक भयानक माणूस भेटणारे आम्हाला....
आम्ही मुळापासून हादरून जाणार आहोत...
काय काय अनलर्न करणार आहोत!!
आमच्या परिघात-बाहेर असणारा मोठ्ठा ' विचार' आम्हाला पोटात घेणारे....
आमच्या बरोबर एक माणूस अजून जोडला गेलाय...
सब प्राईम मोर्ट्गेज चा डायरेक्ट लाभार्थी....
हो!! मग आम्ही कुत्र्यासारखे भटकणार आहोत....
परिवलन नि परिभ्रमण दोन्हीही करणार आहोत ....
No comments:
Post a Comment