Monday, June 13, 2011

सुर्यमंदिर


प्रवाह

[surya-mandir-modhera.jpeg]
सुर्य एक प्रवाह - अवकाश विस्तारणारा

सुर्य एक पात्र - काळोख्या रंगमंचावरचे

सूर्याला अस्तित्व जमिनीने ....

त्याच्या किरणांचा अधोमुखी प्रवाहांना

....उसळत भेदणारे एक उर्ध्व वस्तुमान....

शक्ती अन प्रकृती , नारी - नर....

उर्जेला ढाळत जातात काळ्याशार अवकाशामध्ये.

महाभूतांतले एकात्म दर्शवणारा ...

हा लय-बद्ध प्रकाशाचा खेळ.



प्रकाशी चक्रे जणू घडवतात

कृष्ण अंधाराला....आणि

शून्यातून उदयास येतात लावण्य-शिल्पे

भिरभिरत भान देत असतो हा कृष्ण अंधार ....

अवकाशाच्या उदरातील गूढ इतिहासाचे...




उत्सव ........

रंगमंचावर स्थिर थंड अंधार.....

एका क्षणी उन्मादात घुसतो सूर्याचा प्रवाह-

बाह्य देहावरून पसरतो शिखराकडे.

अर्धोन्मीलित डोळ्यातून पोहोचतो ताशीव प्रतीमांकडे
अल्लड आश्वासक...

छेडत अवकाशाला, प्रवास त्याचा गाभ्याकडे....
उत्सव साजरा करतो अन उधळतो ,
उर्जेला...तत्वांपलीकडे.....

प्रकाश बीज पेरतो पाषाणी अंधारात .....



( मोढेरा सुर्य मंदिर - चक्र 2009)

1 comment:

  1. सूर्य एक आभास शापित मनाच्या निरन्तर संध्येचा ......

    "सुर्य एक पात्र - काळोख्या रंगमंचावरचे" ... लैई भारी

    ReplyDelete