Sunday, May 23, 2021

What makes you not a buddhist : an introduction

What makes you not Buddhist 

हे झोन्गसार ह्येन्त्से यांचं पुस्तक वाचकास बौद्धदर्शनाच्या मुलभूत तत्वांचा सुलभ परिचय करून देते. हे पुस्तक बौद्धदर्शनाची सिद्धार्थच्या प्रवासातून ओळख करून देते. 

लेखक सिद्धार्था सोबत जागतिक राजकारण,फॅशन,विविध 

भौगोलिक प्रदेश,आधुनिक नातेसंबंधांच्या प्रदेशात फिरून येतो आणि बौद्ध शिकवणुकीला पारंपरिक, आधुनिक दोन्ही 

चौकटीत विस्ताराने मांडतो.


झोन्गसार ह्येन्त्से बौद्धदर्शनाची चार प्रमुख तत्व पुढील प्रमाणे 

मांडतात : 

 

. Fabrication and Impermanence : 

 

सिद्धार्थ आयुष्याचा सुरुवातीचा काळ सुरक्षित वातावरणात घालवतो.पण हळुहळु बाहेरच्या जगात जाऊन स्वतःची मानवी आयुष्याविषयी उत्सुकता शमवतो

सिद्धार्थचं त्याच्या सारथ्यासोबत महाल सोडून बाहेरील जगात फिरणं,मानवी दुःखाविषयी निष्पाप प्रश्न विचारणं हेच त्याच्या पुढील आयुष्याच्या चिंतनाचा पाया होऊन जातं

ह्या प्रवासात सिद्धार्थ त्याच्या वडिलांसोबत, त्याचा सारथी चन्नासोबत त्याने पाहिलेल्या प्रसंगांविषयी चर्चा करतो

पण शुद्धोदन राजा आपल्यापासून काहीतरी मुलभुत लपवत आहे ह्या भावनेने सिद्धार्थ महाल सोडून निघून जातो

इथे सत्य-तथ्य लपवून दुसऱ्यांना आणि

स्वतःला तथ्यापासून विचलित करण्याच्या मानवी वृत्ती बद्दल ह्येन्त्से टिप्पणी करतात

वर्तमानपत्र,टीव्ही,जाहिराती,

सोशल मीडिया आपल्याला सुखी आयुष्याच्या संकल्पना विकत 

असतातते विकण्यासाठी त्यांना जे अमंगल आहे,गैरसोयीचे आहे ते लपवावं लागतं किंवा जोडकाम करून त्याला जाहिरातदाराच्या सोयीचं रूप द्यावं लागतंहा खोटेपणा आहे,भ्रम निर्माण करणे आहे

हे कदाचित माहीत असतानाही कि हे असत्य आहेभ्रम आहेशाश्वतनाही तरीही ह्या खोटेपणाला आपण भुलतो

त्या भुलण्यात रोजच्या दुःखकारक घटनांपासून पळण्याचा,

जाणीवपूर्वक लक्ष विचलित करून भ्रमात सुख मानण्याचा विचार 

असतो

आपल्या सोयीच्या गृहीतकांविषयी,आपल्या शाश्वत 

गरजांसंदर्भातल्या विरोधाभासाविषयी इथे लेखक लिहितो

सिद्धार्थ जेव्हा त्याच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी निघतो तेव्हा 

त्याला लक्षात येते कि सगळे पदार्थ हे एकमेकांवर अवलंबून आहेत

कुठल्याही तत्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही,ते विविध घटकांनी जोडलं गेलं आहेकिंबहुना ते उत्पन्नविनाशी आहे असेही त्याला समजतं.


सिद्धार्थ जेव्हा त्याच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी निघतो तेव्हा 

त्याला लक्षात येते कि सगळे पदार्थ हे एकमेकांवर अवलंबून आहेत

कुठल्याही तत्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही,ते विविध घटकांनी 

जोडलं गेलं आहेकिंबहुना ते उत्पन्नविनाशी आहे असेही त्याला समजतं.


ह्याच विचाराला पुढे घेऊन जाताना लेखक विविध समाजमान्य संकल्पनांबद्दल टिप्पणी करतोउदा. शाश्वत प्रेम,शाश्वत सुख,मुक्ती. लेखकाच्या मते हे मुळातच एक मानव रचित कुभांड आहे.  

सतत बदलत असणाऱ्या,विविध कारणांनी परिणामीत होणाऱ्या गोष्टींमध्ये सतत व्ययघट होत असतेती घट व्यक्ती

किंवा वस्तूला शाश्वत बनवू शकत नाही

लेखक अंड्याच्या उदाहरणातून दाखवतात कि अंड्याला कसे विविध अवस्थांतून विकसित व्हावं लागतंतेव्हांच ते अंडे शिजवण्यासाठी 

वापरता येतेअंडेही पुन्हा विविध घटकांनी बनलेले आहे

जसं की कवच कॅल्शियमपासून,अंतर्गत भाग पांढऱ्या-पिवळ्या बलकाचा बनलेला असतो जो कि पाणी आणि प्रोटिन्सचा 

बनलेला असतोअशा पद्धतीने अंड्याचे अतिसुक्ष्म घटकांत-उपघटकांत पृथक्करण करता येऊ शकते

अंडे शिजवल्यानंतर अंड्याच्या रूप-गुणांत बदल होत राहतातहे बदल सतत होत जाणं आणि ते उत्पन्न-विनाशी असणं,एकमेकांवर अवलंबुन असणे हाच अनित्यवाद ह्या बौद्ध संकल्पनेचा गाभा आहे

लेखक इथे जाणीवपूर्वक नमूद करतो की अनित्यवाद ही काही नकारात्मक भावना अथवा विचार नाहीपदार्थांमध्ये होणाऱ्या बदलांविषयीची,त्यांच्या 

घटकांतील आंतरसंबंधाची माहिती असणे ह्यातून काही छोटे मोठे 

बदल सुचू शकतात आणि मोठी संकटं टाळता येऊ शकतात

उदाप्लास्टिक विघटनशील

नसल्यामुळे होणारे निसर्गाचे नुकसानाची माहिती असल्यामुळे त्याचा वापर कमी करणे किंवा त्यासाठी निरोगी पर्याय शोधणे. 


 

. Emotion and pain :

 

सिद्धार्थाची गोष्ट पुढे सरकवताना ह्येन्त्से काही पारंपारिक मिथक 

कथांचा आधार घेतात

सिद्धार्थ त्याच्या साधनेसाठी पराकाष्ठेचे प्रयत्न घेतोयसमर्पणाच्या भावनेने दुःखाचे रूप जाणण्यासाठी ध्यानमग्न आहे तेव्हा मार हा 

मिथिकल दैत्य सिद्धार्थवर पूर्ण शक्तीनिशी हल्ला करतो

मार हे षडरिपूचे प्रतीक असावंसिद्धार्थ माराच्या हल्ल्यांना ध्यानातूनसंयमाने उत्तर देतोय.माराशी बोलताना सिद्धार्थ एका टप्प्यावर त्याला सांगतो कि मला बाह्य प्रमाणाची आवश्यकता नाही.पृथ्वी माझ्या 

साधनेची साक्षीदार आहेबाह्यप्रमाणाची 'स्व' च्या जडणघडणीत आवश्यकता भासणं हे तणाव निर्माण 

करणाऱ्या भावनांचं कारण बनतं हे आपल्याला माहितीच आहे

सिद्धार्थ इथे त्या भावनेला धुडकावून लावतो

 

आधुनिक जगात वस्तूंच्या अतिरेकी वापरातून किंवा संचयातून 

निर्माण झालेल्या संसाधन ऱ्हासप्रदूषण यामुळे परिसंस्थेसोबत 

मानवी आरोग्याची हानी होते

ह्या उदाहरणातून मानवी स्वार्थामुळे किंवा तृष्णेला चिकटून बसल्यामुळे आपत्ती किंवा दुःख उदभवतात असं 

लेखक नमूद करतो. 


कुठलाही स्वभाव तपासत असताना बऱ्याचदा त्यातील विविध 

घटकांना आपण पाहत नसतो

त्या घटकांतील उपघटकांकडे पाहत असताना आपण त्यांच्या उथळ अर्थांकडे तसेच केवळ काही 

वरवरच्या गुणधर्मांकडे पाहिल्यानेत्यातच गुंतून राहिल्याने एकाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे स्वभावदर्शन तर्कसंगत होत नाही

बुद्ध म्हणतो की हे प्रामुख्याने अविद्ये मुळे होते

सूक्ष्म उपघटकांचा सखोल शोध घेणं म्हणजे 'स्वला बळकटी देणे नाही.तर स्वविषयीची अविद्या,तृष्णा आपल्या दुःखाला बळकट करतात.सिद्धार्थच्या सुरुवातीच्या मुलभूत सिद्धांतात दुःखाचे प्रमुख कारण अविद्या आहे असे सांगितले आहे. ही अविद्या दुःख-स्वरुपा विषयी असेल किंवा दुःख निर्माण करणाऱ्या कार्यकारण संबंधांविषयी असेल. 

 

पतंगाचं मेणबत्तीच्या ज्योतीशी खेळणेमाशांचे मांस चिकटवलेल्या 

गळाकडे अलगद खेचले जाणे ह्याचं आपल्या पैसा,प्रतिष्ठा,फूड,

सौंदर्याकडे आकर्षित होणाऱ्या तृष्णेशी कमालीचे साम्य आहे


सिद्धार्थाकडे यावर असा मार्ग होता कि दुःखकारक भावना 

उद्भवत असतील तर स्वभाव तपासून त्या दुःखा-विषयी निर्माण झालेली जाणीव रोखता येते.

सोबत घटनांतील, त्याच्या प्रतिक्रिये

संदर्भातील कार्यकारण संबंध तपासून दुःख निर्मूलन करता येणे 

शक्य आहे असेही सिद्धार्थ सांगतो



. Everything is emptiness : 

 

सिद्धार्थच्या साधना प्रवासाविषयी पुढे सांगताना 

लेखक तिबेटी गुरु मिलारेपा आणि शिष्य रेचूंगपाची गोष्ट सांगतात.


आपल्या रोजच्या अनुभवातील ऐंद्रिय गोष्टींना,पदार्थाना स्वतःचा 

असा स्वभाव नसतोजरी तें विविध गुणधर्मानी युक्त असले तरी 

त्यांत भाव आपण निर्माण केलेले असतात किंवा त्याचा अर्थ आपण आपल्या सोयीनुसार प्रक्षेपित केलेला असतोसर्व पदार्थ हे परतंत्र आहेतत्यांच्या अवस्था जसे कि रूप,काळ,अवकाश,दिशा आणि 

आकार वगैरे गोष्टी सहज घटक-उपघटकांत विभाजित गेल्या जाऊ शकतात

पृथक्करणानंतर असे लक्षात येत कि ह्या अवस्था स्वतंत्र नाहीत

सापेक्ष आहेतसिद्धार्थ म्हणतो कि मृगजळासारखाच 'स्व' हि सापेक्ष असतो

 

डोंगर आणि नदीचे उदाहरण देताना लेखक पुन्हा हा मुद्दा मांडतो कि,काल पाहिलेला डोंगरनदी आज तशीच्या तशी अस्तित्वात नाही

त्यांचा आकार वाढत घटत राहतोतो वेगवेगळ्या ऋतूंवर,हवामान 

बदलांवर अवलंबून असतोपण आपल्याला डोंगराचेनदीचे आजचे रूपच सत्य आणि शाश्वत वाटते किंवा ते असेच अनादी/अनंत 

होते/असेल असेही वाटते

सिद्धार्थची मीमांसा इथे आणखी खोलवर जातेत्याला असं दिसतं कि पदार्थ हे सत आहेत हे सिद्ध करण्यास ते परतंत्र असता काम नये हे सिद्ध करावे लागेल.म्हणजेच पदार्थाला स्वतःचा असा स्वभाव ही

असायला हवा

मात्र सिद्धार्थ/बुद्ध सांगतो की जगातील प्रत्येक पदार्थ परतंत्र आहे.

पदार्थ अस्तित्वात असण्याचे काहीतरी कारण आहे.

अशा कार्यकारण संबंधांमुळे प्रत्येक पदार्थ हा नि:स्वभाव आहे

ह्यालाच पदार्थाची शून्यता म्हणतात

बुद्ध शून्यता समजून सांगताना साप आणि दोरखंडाचे उदाहरण देतो

जॅकला सर्प भीती वाटतेतो एकदा एका अंधाऱ्या खोली मध्ये जातो तेव्हा त्याला एक सर्पाकार दिसतो आणि जॅक त्याला घाबरून पळ काढतो.पण तथ्य असे आहे कि तो मुळात एक दोरखंड आहे,केवळ तो सर्पाकारात भिंतीवर लटकत होता म्हणून जॅकच्या मनात भीती 

उत्पन्न झालीह्या भीतीदायक अनुभवाला बुद्ध संसार म्हणतोजेव्हा जॅकला त्या दोरखंडाचे रूप प्रकाशात दाखवले जाते तेव्हा त्याला 

सुरक्षित,निर्भय वाटतं

लेखक असं सांगतो कि ह्या निर्भय भावनेला बुद्ध निर्वाण अवस्था 

म्हणतो. 

ह्या उदाहरणाच्या अनुषंगाने लेखकाने पुस्तकात विविध मुद्दे मांडले आहेत

त्याचा सार म्हणजे पदार्थांचे (सर्पाकार दोरखंडाचेस्वतंत्र अस्तित्व

अविद्येला समजून घेऊन तसेच कार्यकारण संबंधांमुळे नाकारता येते

जॅकचे गृहीतक ज्यामुळे त्याच्या मानत भयाची भावना उत्पन्न झाली होती ते मग शून्य होते

 

बुद्धाचं मूळ उद्देश्य हा जॅकला भयकारक अवस्थेतून बाहेर 

काढणे हा आहे



. Nirvana is beyond concept : 

 

बौद्ध मिथकानुसार बुद्ध निर्वाण स्थिती प्राप्त करेपर्यंत विविध सजीव अवस्थांत रूपांतरित होत राहिला आणि सरतेशेवटी त्याने अविद्येवर मात करून बहुजनांना दुःख निर्वाणाचा मार्ग दाखवला

 

सिद्धार्थासाठी अंतिम आरामावस्था म्हणजे निर्वाण आहेहि अशी स्थिती असावी कि जिथे अविद्या,भ्रम,तृष्णेचा उपशम झालेला आहे.लेखक असे सांगतो कि शाश्वत सुख हि केवळ एक संकल्पना आहे

निर्वाण अवस्थेचे वर्णन करण्यासाठी हि संकल्पना बौद्ध दर्शनात 

वापरली जाते

लेखाच्या मतानुसार आरामावस्था म्हणजे निर्वाण अवस्था कारण कुठलाच संदेह,अविद्या,सुखरहित/सुखाने परिपूर्ण अवस्था ह्या उत्क्रांत टप्प्यावर अस्तित्वात नसते


त्याचवेळी - निर्वाणअवस्थे संदर्भात शांत अवस्था किंवा सुखावस्था दोन्हीचा शोध घेणं व्यर्थ आहे असाही विचार लेखक मांडतो. इथे लेखक बौद्ध कथांमधून एक उदाहरण देतो.

नंदालास्वतःच्या चुलत भावाला सिद्धार्थ त्याच्या तृष्णेतून बाहेर 

काढायचा प्रयत्न करतो

तो नंदाला हळूहळू तृष्णेच्याच जाळ्यात ओढून विविध कसोटी

पाहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जायला लावतोनंद अजाणतेपणी सतत तृष्णेचीच निवड करत राहतो पण एक वेळ अशी येते कि नंदाला 

त्याच्या तृष्णेतील फोलपणा लक्षात येतो.

नंदाला त्याच्यातील तृष्णेसंदर्भात

स्वतःतील विरोधाभास ठळक समजत जातात

जेव्हा त्याला तृष्णा अपायकारक आहे हे समजतं तेव्हा तो 

सुखावस्थेचा,सुख-विरहित अवस्थेचा (दोन्हीचा)त्याग करतो

 

जर निर्वाण म्हणजे फक्त सुखावस्थाशांतावस्था असेल तर जेव्हा 

एखादी नवीनच अस्वस्था प्राप्त होईल तेव्हा अगोदर अनुभवलेली 

कुठलीही अवस्था सहज सोडून देता येईल.  

लेखक म्हणतात कि कुठलीही सुखावस्था हि मुळातच भुसभुशीत 

पायावर उभीआहे

 

बुद्धाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे सत्याचा शोध आणि 

त्यासोबतहे प्रतिपादन कि स्वभावाची मूळ जाणीव आपल्याला दुःखनिर्मूलनास मदत करते

 

लेखक निर्वाण अवस्थेचा एक विशिष्ट पैलू उदाहरणाद्वारे उलगडून 

दाखवतात

जेव्हा सूरी धारेच्या दगडावर घासली जाते तेव्हा ती तीक्ष्ण होतेपण हे होत असताना दगड आणि सूरी दोन्हीचं निःशोषन होतं किंवा घट होते

त्याचप्रमाणे निर्वाण अवस्था म्हणजे भ्रमावस्थेचं घटत जाणं 

आणि त्याचवेळी भ्रमावस्थेसाठी निदान शोधणाच्या गरजेचंही संपून जाणे

 

आणि शेवटी निर्वाण अवस्थेकडे मार्ग जाणतेपणी त्याग करणे हेही 

बौद्धदर्शन आहे असे लेखक म्हणतो




बौद्ध दर्शनाची सहज ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं

लेखकाने एका गहन विषयाला सुटसुटीत करून मांडलं आहे

लेखक सिद्धार्थची गोष्ट सांगता सांगता रोजच्या जगण्यातले विषय बौद्धमतासंदर्भात उलगडून दाखवतात

पुस्तक वाचत असताना महत्वाच्या तात्विक प्रश्नांचे विवेचन लेखकाने सहज समजू शकणाऱ्या उदाहरणातून मांडलं आहे.   

लेखक पारंपरिक परीघ ओलांडून उदाहरणं देतात त्यामुळे विविध व्यक्तींना पुस्तकातील संदर्भ ओळखीचे वाटू शकती

 

 



 

पुस्तक वाचताना केलेलं टिपण : बुद्ध म्हणतोय, इच्छांचं पृथक्करण कर. तो जो साप आहे गळ्यात, त्याचं सापत्व जाण. त्याने सोडून दिलेल्या कातीला, त्याच्या निर्हेतुक थंड स्पर्शाला, त्याच्या बचावात्मक फुत्काराना, जाणता जाणता, त्याच्या ठायीच्या सापत्वाला, जाणता जाणता जाण की, सापत्व भयाच प्रतिबिंब. त्याचं अभय त्याचं अरण्य तूच. त्याच्या फुत्कारातला श्वास तूच. सापत्वाच्या शरीराचे विभिन्न घटक बघ, सापत्व सतत सूक्ष्म घटकांत विभाजित होता होता, तरंगत्या अवकाशातील, विखरत गेलेलं, विलग त्याचं बिंदुत्व जाण. त्या बिंदूतल बिंदूत्व जाण. ह्या बिंदूंच्या आंतरसंबंधातल- अस्तित्व लोप पावत गेलेलं सापत्व तपास. त्यासोबत शून्य झालेलं अभयारण्य बघ. बिंदूमय अवकाशात, विभाजित होत होत विलय पावलेला धम्म जाण.

No comments:

Post a Comment