Friday, July 19, 2013

एका महान नेत्याच्या मृत्युनंतर

फ्लेक्सवर बसलेल्या कावळ्याचे विश्वरूपदर्शन

एक होता कावळा
चिकित्सक आणि सत्यशोधक
अचानक थंड पडलेल्या   महावस्तीवाला  काय झाले
म्हणून मेणाच्या घरट्यातून  पडला बाहेर.....
आणि  फ्रेश perspective घेण्यासाठी येऊन बसला
एका उंचच उंच धगधगत्या फ्लेक्सवर....
काय बरे दिसले त्याला तेथून...

काय काय दिसल.....
काय काय दिसलं.....

पोकळी दिसली - वोकळी दिसली
हुजरे दिसले- मुजरे दिसले
अनुयायांचे छाटलेले पंख दिसले...
अनुनयाच्या लाचार झोळ्या दिसल्या...

घाबरू कळपांतले -
असहाय्य लिबलिबीत डोळे दिसले
ढवळा-नीळा - हिरवा- तांबडा दिसला
शेपूट  पायात लपवलेले कलावंत दिसले....
अन दिसले अवसानघातकी आश्रित
शब्दसृष्टीचे ईश्वर...

राजकीय हत्यांचे celebrated-
ancient   सुडपर्व  दिसले...
स्थितप्रज्ञ मुर्त्यांच्या डोळ्यांवरली
झिरझिरीत भगवी पट्टी दिसली...


अजून काय दिसले....
अजून काय दिसले....


भेगा दिसल्या - जखमा दिसल्या
अश्रू दिसले - मगरी दिसल्या'
उस दिसला - कापूस दिसला
जळण दिसले - पेटवणे दिसले

एका खिडकीत
गुलाबी पिंजऱ्यातला
अस्मितेचा पोपट दिसला...

(अपूर्ण)


















No comments:

Post a Comment