Saturday, December 10, 2011

दुपार

दुपार ढवळत निघालीय
सावल्यांना टोके काढत
पोरक्या हाकेची -
एक शीर तणतणत
माळावरल्या कहारात
विरत विरत संपली...

अशाच वेळी कदाचित....
कुळवातून  सांडणाऱ्या
अस्वस्थ सूर्याची
धांदल टिपायला
vincent डोक्यात
तप्तचक्र घेऊन
बाहेर पडत असेल ...

No comments:

Post a Comment