कड्यावरचे एक झाड.
वरून कोसळणाऱ्या पावसासोबत चमचमणारे.
त्यावरची पांढरी भाबडी फुले. लांबून वाटावे फांद्यावर सहस्त्र शुभ्र पक्षी बसलेत.
आता ते उडतील तर झाड निष्पर्ण व्हावे. पण ते उडतच नाहीत.
झाडांवरच गोठून पुतळे झालेत पक्षी. त्यांचीच फुले झाली?
आणि रात्री ह्या झाडांची अवस्था वेगळीच.
हजार दिव्यांनी लगडलेली. त्या दिव्यांनी मग एकत्र उडावे तर झाडे उडेल.
झाडाल मोहोर हे असेही लागलेले.
पक्ष्यांचे अन काजव्यांचे
मस्त आणि अर्थपूर्ण
ReplyDeleteमला ही कविता फेसबुकवर प्रसिद्ध करायला आवडेल -- परवानगी असल्यास.
ReplyDeletejaroor sir! thanks.
ReplyDeleteplease send me a link when you post it on fb. As i dont have a fb account.
Please send me your E-mail ID
Delete