शहर
ह्या शहरात
इतकी शरीरे
ह्या रस्त्याना कुठे ओढून घेऊन निघालीत
कुठल्या नवीन शहरात ?
कुणास ठावुक ?
चौका चौकातही ही शरीरे
निर्जीव आवाज़ आणि प्रकाशांचे बाण
चाहू बाजुन्वर सोडून, भुर्रकन निघून जातात !
ही शरीरे
रोज रात्रि - या जालीदार घरांत
जाउन अडकतात,
अन परत उसली मारतात। उद्यासाठी ।
तेव्हा काही वेग्लीच दिसतात, दिवसा सारखी।
या शहरात
सर्पोद्यानाताल्या जनावरान सारख्या
नर आणि माद्या
एकमेकांत अलगद अडकतात
कोण आश्रित ? कोण मालक ?
या शहरात
मधोमध एक भिंत आहे
एक बाजूला सफ़ेद सोंगटी
विरूद्ध बाजुला काल्या
एका बाजू च्यानना 'संस्कृति ' विषयी घोर प्रश्न आहेत ! ?
एका बाजु च्यान्ना
भूके विषयी तीच ancient कोडी पडतायत !
दोन्ही बाजूंची प्यादी मात्र सारखीच मारली जातायत !
ह्या शहरात
रिकाम्या नाल्यांत
उन्हाने उखडलेली शरीरे राहतात
ह्या शहरांतले नर -
कसले तरी हिशेब चुकते करत असतात
किंवा मग स्मशान झोप घेत असतात
ह्या शहरआतल्या मादया
एक तर कादम्बरी- टी.वी मलिकांत राहतात
नाहीतर जुगाराताल्या पत्त्यांवर !
ह्या शहरात
उत्सव असतात
हिरवे, नीले, भगवे
प्रत्येक पताकेला असते जीवघेणी धार
निष्पाप झेल्तायत अजुन इतिहासाचे वार
असल्या या शहरात
रोज़ माझ्या बस मधे
एक काले जर्द शरिर चढ़ते
पाय थर थरत असतात
टोपी कशीबशी सम्भाल्लेली असते
ओठांवर काले-नीले हसू असते,
अन डोळ्यात असंख्य खिडक्यांची प्रतिबिम्बे
या शहरात
रोज प्रत्येकजन
मिळेल त्या खिड़कीतुन उडी मारतो
मिळेल तसा रास्ता ओढायला लागतो .
No comments:
Post a Comment